सादर नमस्कार,
राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थितीत सर्वच मतदार संघात पक्ष संघटन, राजकीय मित्र पक्ष, नाराज कार्यकर्ते यांची फळी व पक्ष अंतर्गत गटबाजी या विषयीची समिकरण बदललेली आहेत. या परिस्थितीत उमेदवार व त्यांच्या निष्ठावान कार्यकर्ते यांच्या येणाऱ्या निवडणुकीत राजकीय कौशल्याचा कस लागणार आहे. या व अशा अनेक विषयांची जाण ठेऊन कमीत कमी वेळेत आपल्या निवडणूक यंत्रणेला अधिक परिपक्वता प्राप्त व्हावी म्हणून आम्ही पुढील यंत्रणा विषयी प्रस्ताव देत आहोत.

कृष्णनिती सामाजिक व राजकीय सल्लागार समूह हा येणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्या मतदार संघाचा सखोल अभ्यास करून आपली सामाजिक व राजकीय यंत्रणा भक्कम करण्यासाठी आपणास विविध सेवा देत आहे.

येणाऱ्या निवडणुकीत आपला बहूमताने विजय व्हावा या सदीच्छासह हे पत्र सादर करत आहोत.

धन्यवाद..!
विजय वरुडकर
राजकीय व सामाजिक रणनितीकार